शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:15 IST

चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीप ओढ्यात बुडाली.

- संतोष स्वामीदिंद्रुड (बीड): सिरसाळा - मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात जीपसह तिघे तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती.  ग्रामस्थांना गाडीतील दोघांना वाचविण्यात यश आले होते तर एकजण बेपत्ता होता. आज दुपारी त्याचा मृतदेह घटनास्थळापासून जवळ एका बंधाऱ्यातील गाळात सापडला. रईस अन्सर अत्तार ( ३५ ) असे मृताचे नाव आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे. दरम्यान, आज दुपारी शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार व दिपक चोरघडे हे तिघे दिंद्रुडहून जीपमधून अंबाजोगाईकडे निघाले होते. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा  रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्याला पुर आला आहे. चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीप ओढ्यात बुडाली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने जीपसह तिघे तरुण ओढ्यात शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. गाडी ओढ्यात बुडाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ बचावकार्यासाठी धावले. शेख अखिल आत्तार व दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र शेख रईस अन्सर अत्तार हा तरुण बेपत्ता होता. शुक्रवारी पाऊस व पुरामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. 

दरम्यान, आज सकाळी साडे अकरा वाजता परळी येथील अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाचा शोध सुरु केला. काही वेळाने घटनास्थळापासून काही अंतरावरील बंधाऱ्यातील गाळात तरुणाचा मृतदेह आढळून आला. धारूरच्या तहसीलदार दत्ता भारस्कर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड घटनास्थळी तळ ठोकून होते.

व्यापाऱ्याचा प्राण आणि रक्कम दोन्ही गेले शेख अखिल अत्तार आणि शेख रईस अन्सर अत्तार हे नातेवाईक आहेत. ते दोघे व्यापारी असून दरवर्षी फटाक्यांचे दुकान लावतात. यावर्षीचा माल भरण्यासाठी  दीपक चोरघडेची जीप घेऊन दोघे अंबाजोगाईकडे निघाले होते. या व्यापाऱ्यांकडे फटाके खरेदीसाठीची जवळपास दोन लाखांची रक्कम होती अशी माहिती आहे. ओढ्यात बुडाल्यानंतर तिघेही गाडीसह काही अंतरावर वाहत गेले. याच दरम्यान व्यापाऱ्याकडील रक्कम पाण्यात तरंगत ओढ्याच्या जवळच असलेल्या  मुंगी-सुकळी तलावापर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले आहे. 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूRainपाऊस