Thane's choice for vacant posts | रिक्त जागांवर झाल्या ठाणेदारांच्या निवडी
रिक्त जागांवर झाल्या ठाणेदारांच्या निवडी

ठळक मुद्देबीड पोलीस अधीक्षकांचे आदेश : ७ अधिकाऱ्यांचा समावेश

बीड : जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुभवी महेश टाक, नवख्या श्रीकांत डोंगरेसह सात जणांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हे आदेश काढले.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील सपोनि नितीन पगार, नेकनूरच मनोज केदारे, बीड ग्रामीणचे शितलकुमार बल्लाळ यांची पदोन्नतीवर तर अंमळनेर येथील विशाखा धुळे, अंभोºयाचे यशवंत बारवकर, पिंपळनेरचे श्रीकांत उबाळे, सिरसाळ्याचे राठोड यांची जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण झाल्याने बदली झाली. त्यांच्या जागेवर नवीन ठाणेदारांच्या बुधवारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नियूक्त्या केल्या. नेकनूरला अनुभवी सपोनि महेश टाक, बीड ग्रामीणला सुजित बडे, चकलांबाला विजय देशमुख, अंमळनेरला श्यामकुमार डोंगरे, अंभोºयाला ज्ञानेश्वर कुकलारे, पिंपळनेरला शरद भुतेकर तर सिरसाळा येथे श्रीकांत डोंगरे यांची नियूक्ती केली आहे. डोंगरे यांची ही ठाणेदार होण्याची पहिलीच वेळ आहे. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी त्यांना सुचना व आदेश दिले. काहींनी बुधवारी रात्रीच ठाण्याचा पदभार स्विकारला आहे.


Web Title: Thane's choice for vacant posts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.