शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

तलवाडा ठाणे प्रमुखांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:57 AM

गेवराई तालुक्यातील मारफळा येथे झेंड्यावरुन झालेला वाद तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना भोवणार आहे. एका बाजूने आलेल्या तक्रारीवर दुसऱ्या गटाची बाजू ऐकून न घेता तात्काळ कारवाई करणे त्यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देमारफळा झेंडा प्रकरण : दुसरी बाजू समजून न घेता कारवाई करणे येणार अंगलट

बीड : गेवराई तालुक्यातील मारफळा येथे झेंड्यावरुन झालेला वाद तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना भोवणार आहे. एका बाजूने आलेल्या तक्रारीवर दुसऱ्या गटाची बाजू ऐकून न घेता तात्काळ कारवाई करणे त्यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसत आहे. लवकरच शेळके यांची उप विभागीय पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मारफळा येथे झेंडा रोवणे व काढ्यावरुन दोन गटात वाद झाले होते. त्यानंतर शनिवारी हे वाद टोकाला गेले आणि दगडफेक झाली होती. परंतु शुक्रवारी रात्री मारफळा ग्रामस्थांनी झेंडा काढावा यासाठी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

सपोनि शेळके यांनी तात्काळ धाव घेत झेंडा लावणाºयांची बाजू ऐकून न घेता बंदोबस्तात झेंडा काढला होता. सकाळी हा प्रकार तांड्यावरील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांवर दगडफेक केली. यात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी मोठा फौजफाटा वेळेवर पोहचल्याने तणाव निवळला होता.

दरम्यान, शेळके यांनी कारवाईची घाई का केली ? तांड्यावरील लोकांची बाजू समजून का घेतली नाही ? झेंड्याचा वाद शेळके यांना माहीत होता का ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळेच हा वाद उद्भवल्याची चर्चा असून, वरिष्ठांनी शेळके यांचा अहवाल मागितल्याचे सूत्रांकडून समजते.उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.नुकताच स्वीकारला तलवाडा ठाण्याचा पदभारसपोनि मारुती शेळके यांनी नुकताच तलवाडा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेला आहे. अद्याप त्यांनी संपूर्ण परिसराची परिपूर्ण माहीती नसल्याचे समजते. तरीही एवढ्या गंभीर प्रकरणात त्यांनी कारवाईचे पाऊल तात्काळ का उचलले ? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. हीच कारवाई आता त्यांच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे.चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईलया प्रकरणात नेमके काय झाले याची सविस्तर चौकशी सुरु केली आहे. ग्रामस्थांसह पोलीस अधिका-यांची चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल. आताच यावर बोलणे उचित नाही.- डॉ. अर्जुन भोसलेउपविभागीय पोलीस अधिकारी गेवराईआमच्या कारवाईमुळे वाद झाला नाहीशुक्रवारी रात्री ११.३० वाजता ग्रामस्थांची तक्रार आली. त्यानंतर तात्काळ जाऊन कारवाई केली. आमच्या कारवाईमुळे वाद झाला असे म्हणता येणार नाही. आता हा चौकशीचा भाग आहे.- मारुती शेळकेसहाय्यक पोलीस निरीक्षक, तलवाडा

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा