शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:39 IST

आष्टीतील बिबट्याने रात्रीच्या अंधारात गाडीचा रस्ता अडवला, VIDEO व्हायरल

- नितीन कांबळे

कडा (बीड):बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. आष्टी तालुक्यातील भवानीनगर तांड्याजवळ एका बिबट्याने थेट रस्त्यावर ठाण मांडले आणि एका वाहनचालकाचा रस्ता अडवल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्यांनी आपला अधिवास बदलून आता चक्क रस्त्यावर येऊन बिनधास्तपणे संचार सुरू केल्याने डोंगरपट्ट्यातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यातील विविध गावांच्या डोंगरपट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचे वास्तव्य आहे. वर्षानुवर्षे त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. वनविभाग 'ठिकाण बदलून वास्तव्य' असल्याचे सांगत असले तरी, जनजागृती पलीकडे ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बावी येथील एका तरुण शेतकऱ्याचा बिबट्याने जीव घेतला होता. याशिवाय पाळीव श्वान, वासरं आणि शेळ्यांवरही हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तर थेट महामार्गावर वाहनांच्या समोर बिबट्या बिनधास्त फिरत असल्याने, रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

जीव गेल्यावर पिंजरा लावून काय उपयोग?समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी वनविभागाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "बिबट्याचा संचार असलेल्या परिसरात वनविभागाने त्वरित पिंजरे बसवावेत. एखाद्याचा जीव गेल्यानंतर पिंजरा बसवून उपयोग काय होईल? वनविभागाने लोकांचा जीव धोक्यात घालू नये," असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

वन पथकांकडून पेट्रोलिंग सुरूयाबाबत आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांना विचारणा केली असता, त्यांनी "शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि बिबट्या नजरेस पडल्यास घाबरून न जाता खबरदारी घ्यावी," असे सांगितले. तसेच, 'आमच्या पथकांकडून पेट्रोलिंग सुरू आहे,' असे स्पष्टीकरण दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard blocks highway in Beed, terrorizes drivers at night.

Web Summary : A leopard blocked a highway in Beed, creating fear among residents. The big cat's presence on roads highlights increasing human-wildlife conflict. Locals demand proactive measures from forest officials following previous attacks on livestock and people, criticizing delayed responses and calling for immediate preventative action.
टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागBeedबीड