७५ कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:04+5:302021-06-01T04:25:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी तालुक्यात ‘सेवाधर्म’ या कोविड काळातील ...

Ten thousand each for marriages in 75 families | ७५ कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

७५ कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी तालुक्यात ‘सेवाधर्म’ या कोविड काळातील सामाजिक उपक्रमांतर्गत रविवारी परळीतील विविध भागांतील एकूण २१ कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसाहाय्य निधी प्रदान करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ७५ कुटुंबांना ही मदत करण्यात आली आहे.

विवाह साहाय्य निधी कुटुंबीयांना वितरित करताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वधू, मातापिता व कुटुंबातील सदस्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. विवाह साहाय्य निधी देण्यात येणारी कुटुंबे ही सर्वसाधारण परिवार आहेत. ज्या परिवारातील लग्नमंदिर, मज्जीद बौद्ध विहारात होतात. मंगल कार्यालयात नाही. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आपल्या बंधू-भगिनींना आपल्या मुलीचे कन्यादान करणे हे एक मोठे आव्हान झाले होते. दरवर्षी आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह आयोजित करून गरीब व गरजू कुटुंबातील विवाहास साहाय्य करीत असतो, मात्र कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीत टाळेबंदीमुळे हा सोहळा घेता आला नाही. तेव्हा सेवाधर्म या लोकोपयोगी उपक्रमातून ही मदत केल्याचे मुंडे यांनी सांगितले.

रविवारी संगीता भारत व्हावळे, बाळू भाऊराव जाधव, हेमा श्याम माने, सद्दाम अब्दुल शेख, फत्तू मेहबूब शेख, सय्यद अली खय्युम, फेरोज कालू खान, विजय सुभाष कणसे, राजाभाऊ सोपान कांबळे, नशीर खान शरीफ खान, अकबर वजीर सय्यद, चाँद मेहबूब शेख, जाफर सुलेमान पठाण, वजीर मेहबूब शेख, बाबू कोंडीबा कांबळे, श्रीदेवी सुंदर आव्हाड, बाळूराव भानुदास कुकर, राणूबाई प्रभाकर झिंजुर्डे यांसह एकूण २१ कुटुंबांना विवाह निधी देण्यात आला.

नगरपालिकेतील गटनेते वाल्मीक कराड स्वतः सेवाधर्म या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमास मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी वाल्मीक कराड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता तुपसागर, नगरसेवक जाबेर खान पठाण, नितीन रोडे, बाबासाहेब बळवंत, अझीझ कच्छी, सरचिटणीस अनंत इंगळे, विजयकुमार गंडले, सुभाष वाघमारे, रवी मुळे, प्रा.श्याम दासूद, विजय हजारे, धम्मा अवचारे, गिरीश भोसले, सचिन मराठे, पप्पू काळे उपस्थित होते.

Web Title: Ten thousand each for marriages in 75 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.