नांदूरफाट्यावर टेम्पोने एकास चिरडले; घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:18 IST2018-01-31T23:17:58+5:302018-01-31T23:18:08+5:30
नेकनूर येथून जवळच असलेल्या नांदूरफाटा येथे हॉटेलसमोर थांबलेल्या इसमाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी केला असून मृतदेह नेकनूर ठाण्यात आणला होता. कारवाईच्या अश्वासनानंतर सायंकाळी चार वाजता मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदूरफाट्यावर टेम्पोने एकास चिरडले; घातपाताचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
नेकनूर : येथून जवळच असलेल्या नांदूरफाटा येथे हॉटेलसमोर थांबलेल्या इसमाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी केला असून मृतदेह नेकनूर ठाण्यात आणला होता. कारवाईच्या अश्वासनानंतर सायंकाळी चार वाजता मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बप्पा सुभाष काटे (२९ रा.धावज्याचीवाडी) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. काटे हे एका हॉटेलसमोर थांबले होते. एवढ्यात भरधाव टेम्पोने (एमएच २३ - १९४१) त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जागीच ठार झाले. काटे यांना मुद्दामहून टेम्पो अंगावर घालून मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संतप्त नातेवाईकांनी काटे यांचा मृतदेह नेकननूर ठाण्यात आणला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी नेकनूर ठाणे गाठले. बापुराव छत्रभूज तांदळे (रा.तांदळ्याचीवाडी) या टेम्पो चालकाविरूद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.