बीड जिल्ह्यात व-हाडाच्या टेम्पोची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:19 IST2018-02-21T00:19:15+5:302018-02-21T00:19:27+5:30
व-हाडाच्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शिरूर तालुक्यातील खालापूरीजवळ मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतरही जखमी युवकांना तिथेच सोडून पळून जाणारा टेम्पो सात किलोमिटर पाठलाग करून ग्रामस्थांनी पकडला. दरम्यान जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात व-हाडाच्या टेम्पोची दुचाकीला धडक
बीड : व-हाडाच्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शिरूर तालुक्यातील खालापूरीजवळ मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतरही जखमी युवकांना तिथेच सोडून पळून जाणारा टेम्पो सात किलोमिटर पाठलाग करून ग्रामस्थांनी पकडला. दरम्यान जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील आर्वी येथील धनराज मळेकर, नितीन घरगीने व गोटू यादव हे तीन युवक दुचाकीवरून ( क्र. एम. एच.२३ , एम ४७४९) आर्वीहून बीडकडे जात होते. खालापूरी जवळ बीडहून मुंगुसवाडे (जि.नगर) येथे वºहाड घेऊन जाणाºया भरधाव टेम्मोने (क्र. एम.एच.१४, ए.एच. ६१५०) दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात तीनही युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतरही चालकाने टेम्पो न थांबवता पळ काढला. सात किलोमीटरवर पाठलाग करून आर्वी गावात टेम्पो पकडला. सध्या टेम्पो व चालक दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. लग्नासाठी जाणारे वºहाड दुसºया वाहनांतून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.