तहसीलदारांनी तीन तासांत सोडविला शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:28+5:302021-08-28T04:37:28+5:30
रेल्वेसाठी स्वत:च्या जमिनी संपादित झाल्या; परंतु उर्वरित शेतात जाण्यासाठी सर्व रस्ते बंद झाले. त्यामुळे शेतात, वस्तीवर जाण्यासाठी रस्ता ...

तहसीलदारांनी तीन तासांत सोडविला शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न
रेल्वेसाठी स्वत:च्या जमिनी संपादित झाल्या; परंतु उर्वरित शेतात जाण्यासाठी सर्व रस्ते बंद झाले. त्यामुळे शेतात, वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही, तसेच शेतीची मशागत करणे, पेरणी करणे, पीक काढणे आदी शेतीकामांसाठी रस्ताच नसल्याने अनेक अडथळे निर्माण झाले होते. रेल्वे अधिकाऱ्यांना रस्त्यासाठी शेतक-यांनी वेळोवेळी विनंती केली; परंतु शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध होत नसल्याने आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक रवींद्र ढोबळे यांनी तहसीलदार शारदा दळवी यांना भेटून शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
कडा परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत तहसीलदार दळवी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. २५ ऑगस्ट रोजी ४ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देत रस्त्याचा प्रश्न अवघ्या तीन तासांतच मार्गी लावला.
270821\nitin kmble_img-20210827-wa0029_14.jpg