गारगोटी मंदिर परिसरात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे तहसीलदार यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:43+5:302021-04-05T04:29:43+5:30

वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गेवराई येथील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षक भिंत पडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम करणाऱ्या ...

Tehsildar orders to take action against unlicensed builders in Gargoti temple area | गारगोटी मंदिर परिसरात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे तहसीलदार यांचे आदेश

गारगोटी मंदिर परिसरात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे तहसीलदार यांचे आदेश

वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गेवराई येथील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षक भिंत पडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून सदर बांधकाम तातडीने थांबवण्याचे आदेश तहसीलदार, गेवराई यांनी दिले आहेत. दरम्यान, संबंधितावर कारवाई न झाल्यास आपण कोल्हेर रोडवर ५ एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा वडार समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील सर्व्हे नंबर ५८ मधील

वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गेवराई येथील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षक भिंत पाडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी वडार समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, गेवराई नगरपालिका, तहसीलदार, पोलीस ठाणे गेवराई यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. सर्व्हे नंबर ५८ मधील ही जागा सरकारी मालकीची आहे. तरीदेखील एकाने जागेच्या मालकीहक्काबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात प्रकरण सुरू असताना या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळ्यांचे बांधकाम राजरोस सुरू आहे, हे बेकायदेशीर बांधकाम करतांना कोल्हेर रोडवरील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षक भिंत या समाजकंटकांनी पाडली. याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे वारंवार अर्ज करूनही त्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप सुभाष गुंजाळ यांनी केला आहे.

वडार समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दोषी विरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी आपण दिनांक ५ एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचे सुभाष गुंजाळ यांनी शेवटी सांगितले आहे. विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरोधात कारवाई करणेबाबत तहसीलदार यांनी आदेश दिले असले तरी याप्रकरणी नगर परिषद कारवाई करत नसल्याने सुभाष गुंजाळ आत्मदहनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. याप्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.

===Photopath===

040421\img-20210404-wa0154_14.jpg

===Caption===

गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षण भिंत पडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Tehsildar orders to take action against unlicensed builders in Gargoti temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.