तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वादाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:19+5:302021-07-04T04:23:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील तहसील कार्यालयात गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यास देण्यात येणाऱ्या पत्रावरून ...

Tehsil officials and employees will be investigating the dispute | तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वादाची होणार चौकशी

तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वादाची होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : येथील तहसील कार्यालयात गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यास देण्यात येणाऱ्या पत्रावरून अव्वल कारकून व नायब तहसीलदार यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यावर ‘स्वाक्षरीवरून अधिकारी, कर्मचारी एकमेकांवर धावले, काठ्याही आणल्या’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची देखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अवैध वाळू उपसा केलेली वाहने साधारण एक महिन्यापूर्वी बीड तहसीलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यास पत्र देण्यासाठी त्या पत्रावरील स्वाक्षरी करण्यावरून अव्वल कारकून युवराज नागरगोजे व नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली होती. या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांची व वादाच्या प्रकरणाची उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी दिले आहेत.

Web Title: Tehsil officials and employees will be investigating the dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.