बीडमध्ये शिक्षकांचे धरणे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST2021-02-09T04:36:54+5:302021-02-09T04:36:54+5:30
बीड : संभाजी ब्रिगेड प्रणित शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने २०१२-२०१३ च्या नैसर्गिक वाढीव वर्ग तुकड्यांवरील शिक्षकांना निधीसह अनुदान ...

बीडमध्ये शिक्षकांचे धरणे आंदाेलन
बीड : संभाजी ब्रिगेड प्रणित शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने २०१२-२०१३ च्या नैसर्गिक वाढीव वर्ग तुकड्यांवरील शिक्षकांना निधीसह अनुदान घोषित करा या मागणीसाठी सोमवारी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.२०१२-२०१३ च्या नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांवर जवळपास २० हजार शिक्षक कार्यरत आहेत. ते प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे काम विनावेतन इमानेइतबारे करत आहेत. या शिक्षकांच्या मागण्यांची केवळ आश्वासनावर बोळवण करण्यात आली असून या शिक्षकांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन प्रशासनला देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष मनोज कवडे, सचिव उमेश पवार, तालुकाध्यक्ष सचिन कदम, गोवर्धन पवार आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.