आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:33+5:302021-02-05T08:23:33+5:30
धारूर : येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आडस येथे सोमवारी ...

आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
धारूर : येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आडस येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली. धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमनाथ महादेव आकुसकर (५३ रा. आडस ता. केज, सध्या रा. मु. माऊलीनगर, अंबाजोगाई) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ते अंबाजोगाई येथून आडस येथे शेतात गेले होते. या घटनेची माहिती मिळताच आडस पोलीस दूरक्षेत्राचे जमादार अनंत अडागळे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मयत आकुसकर यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून, ‘पोटाच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये’, असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमनाथ आकुसकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.