दिंद्रुड पोलीस हद्दीत शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:51+5:302021-02-06T05:02:51+5:30
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना परिसरातील एका राहत्या घरात शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ...

दिंद्रुड पोलीस हद्दीत शिक्षकाची आत्महत्या
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना परिसरातील एका राहत्या घरात शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
दिंद्रुड पोलीस हद्दीतील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना सुंदरनगर परिसरातील प्रकाश धुमाळ यांच्या घरात येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल या शाळेत कार्यरत राजेंद्र शिवाजी कापडणीस (वय ४२ वर्षे मूळगाव, रा. गंगापूर, ता. सटाणा, जि. नाशिक) हे शिक्षक किरायाने राहत होते. गुरुवारी सकाळी धुमाळ यांनी सदर शिक्षक घराबाहेर न पडल्यामुळे खोलीमध्ये डोकावून पाहिले असता शिक्षक राजेंद्र कापडणीस गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दिंद्रुड पोलिसांना ही बाब समजताच दिंद्रुड पोलीस स्टेशनचे तेलगाव बीट अंमलदार बी.के. सुरेवाड व अनिल भालेराव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. प्रेताच्या उत्तरीय तपासणीसाठी धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दुपारी २ वाजता शवविच्छेदन करण्यात आले होते.