तहसील आवारातील तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय बंद - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:07+5:302021-03-07T04:30:07+5:30
परळी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात दहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे. ...

तहसील आवारातील तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय बंद - A
परळी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात दहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे. तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी एकाच ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेला भेटावेत, या उद्देशाने हे कार्यालय उभारण्यात आले आहे.
सध्या तालुक्यातील विविध गाव सजाच्या तलाठ्यांनी शहरातील विविध भागात भाड्याच्या जागेत आपले कार्यालय थाटले असून, काही तलाठ्यांचे कार्यालय हे तहसील कार्यालयापासून बर्याच दूर अंतरावर असल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठी अडचण होत आहे. तहसील कार्यालय आवारात बांधण्यात आलेले तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयाला वीज जोडणी दिलेली नसून, अवतीभोवती झाडेही उगवली आहेत. सध्या हे कार्यालय पडीक अवस्थेत असून, तलाठी व मंडल अधिकारी एकाच ठिकाणी भेटत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत आहे.