आरोग्याची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:10+5:302021-04-05T04:29:10+5:30
रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारक हैराण पाटोदा : शहर व परिसरात बी.एस.एन.एल.ची मोबाइल सेवा सातत्याने विसकळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला ...

आरोग्याची काळजी घ्यावी
रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारक हैराण
पाटोदा : शहर व परिसरात बी.एस.एन.एल.ची मोबाइल सेवा सातत्याने विसकळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल, तर ती व्यक्ती आऊट ऑफ कव्हरेज एरिया, असे सांगितले जाते. अशी स्थिती इंटरनेट कनेक्शनबाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाइलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही, अशा स्थितीमुळे मोबाइलधारक हैराण झाले आहेत.
रस्त्यालगतचे ढीग वाहतुकीला अडथळा
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढीग वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात घडू लागले आहेत. एक तर रस्ता दुरुस्त करा किंवा रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी उचला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ढीग टाकण्यात आले. मात्र, अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्ता दुरुस्त करून ढीग उचलण्याची मागणी आहे.
रिकाम्या बाटल्यांमुळे डोकेदुखी वाढली
अंबाजोगाई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज परिसर, रेणुकादेवी परिसर, बाराखांबी परिसर व वन विभागातील वृक्षाच्या खाली प्लास्टिकच्या ग्लासांसह रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा मोठा खच पडला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक मद्यपी आपली पिण्याची हौस भागविण्यासाठी या निसर्गरम्य वातावरणाचा सहारा घेऊ लागले आहेत. मद्यपान करून रिकाम्या बाटल्या या परिसरात फेकून तो परिसर अस्वच्छ करू लागले आहेत. अशा मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होऊ लागली आहे.