झाडांचे संगोपन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST2021-01-03T04:34:05+5:302021-01-03T04:34:05+5:30

विक्रेत्यांना चबुतऱ्याची मागणी अंबाजोगाई : कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने दर मंगळवारी आठवडे बाजार समितीच्या प्रांगणात व ...

Take care of the trees | झाडांचे संगोपन करा

झाडांचे संगोपन करा

विक्रेत्यांना चबुतऱ्याची मागणी

अंबाजोगाई : कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने दर मंगळवारी आठवडे बाजार समितीच्या प्रांगणात व मोंढा परिसरात भरतो. अजूनही अनेक भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली भाजी जमिनीवर बसून विकावी लागते. दुर्गंधीने अनेक शेतकऱ्यांवर आरोग्याचा धोका पत्कारून घाणीत बसण्याची वेळ आली आही.

बँकेत ग्राहकांची गर्दी

अंबाजोगाई : शहरात बँकेची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्था, मल्टिस्टेट, या सर्वच ठिकाणी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशी स्थिती असतानाही मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न पाळणे, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. ग्राहकांच्या दुर्लक्षाकडे बँक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Take care of the trees