विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर सय्यद शौकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:11 IST2021-09-02T05:11:29+5:302021-09-02T05:11:29+5:30

पाटोदा : येथील जय भवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. सय्यद यांची नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी ...

Syed Shaukat on Hindi Studies Board of the University | विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर सय्यद शौकत

विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर सय्यद शौकत

पाटोदा : येथील जय भवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. सय्यद यांची नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्राचार्य डॉ. सय्यद यांनी या पूर्वीही सलग १२ वर्षे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केलेले आहे. आतापर्यंत जवळपास ७७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग व पेपर वाचन केले आहे. आतापर्यंत २२ राष्ट्रीय व २ आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना विशेष वक्ता म्हणून निमंत्रित केलेले आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

300821\1455img-20210830-wa0165_14.jpg

Web Title: Syed Shaukat on Hindi Studies Board of the University