गर्भपिशवीवर सूज; जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:09+5:302021-06-20T04:23:09+5:30
गेवराई तालुक्यातील एक ४२ वर्षीय महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. स्त्री रोग तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता गर्भपिशवीवर सूज ...

गर्भपिशवीवर सूज; जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया
गेवराई तालुक्यातील एक ४२ वर्षीय महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. स्त्री रोग तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता गर्भपिशवीवर सूज आल्याचे समजले. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. येथील सरकारी डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया गृह सज्ज केले. या महिलेवर तासभर शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढण्यात आली. सध्या या महिलेवर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण शिंदे, डॉ. परमेश्वर डोंगरे, डॉ. सूरज वाकोडे, डॉ. साजिया, डॉ. शाफे, डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ. संदीप पाटील, परिचारक महेंद्र भिसे, जाफर, कक्षसेवक बागलोन, आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यावेळी डॉ. राम देशपांडे यांचीही उपस्थिती होती.
---
कोरोनामुळे शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. अनेक महिन्यांनंतर आता शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच पाठीतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. शनिवारी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सेवा चांगली देण्यासह तत्परता दाखविली जात आहे.
-डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.
===Photopath===
190621\19_2_bed_9_19062021_14.jpeg
===Caption===
स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयात अनेक महिन्यानंतर गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.राम देशपांडे, डॉ.किरण शिंदेसह शस्त्रक्रिया करणारे पथक दिसत आहे.