तिखट मिरचीने निर्माण केला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:23+5:302021-03-14T04:29:23+5:30

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन ...

Sweet made with chili peppers | तिखट मिरचीने निर्माण केला गोडवा

तिखट मिरचीने निर्माण केला गोडवा

धारूर : तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी तिखट मिरचीचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन आपल्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.

एकेकाळी डोंगराळ, दुष्काळी व ऊस तोडणी कामगारांचे गाव अशी ओळख असणारी जायभायवाडी आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या गावातील तरुण शेतकरी पाणी फाउंडेशनच्या वाॕटर कप स्पर्धेतून झालेल्या कामाचा व परिर्तनाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. मेहनत घेऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन पिके घेत कमी क्षेत्रात चांगले उत्पादन घेऊन आर्थिक बाजू मजबूत करत आहेत. जायभायवाडी येथील तरुण शेतकरी अशोक जायभाये यांची डोंगरात शेती असूनही ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गतवर्षी शेवग्याचे उत्पादन घेतले. यातून चांगला लाभ झाला, तर या वर्षी त्यांनी आपल्या डोंगराळ जमिनीवर फक्त २५ गुंठ्यांत मिरचीची चार हजार झाडे लावली. अडीच महिने जोपासना केली. पहिल्या तोडीला १६ क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले. यातून ५० ते ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापुढेही मिरचीचे दोन ते तीन तोडे होऊन पंचमीपर्यंत या मिरचीचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांना आहे. कमी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानामुळे तिखट मिरची चांगला गोडवा निर्माण होत असून, इतर शेतकऱ्यांसाठी अशोक जायभाये यांची शेती मार्गदर्शक ठरत आहे.

===Photopath===

130321\anil mhajan_img-20210313-wa0028_14.jpg~130321\anil mhajan_img-20210312-wa0018_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील अशोक जायभाये यांनी डोंगरात मिरचीची शेती जोपासली. बाजारात चांगला भाव  मिळत आहे.

Web Title: Sweet made with chili peppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.