आष्टी : तालुक्यातील मातकुळी ग्रामपंचायतवर महिलाराज आले असून ग्रामपंचायतच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती देण्यात आली आहे. उपसरपंचपदी स्वाती काकासाहेब डोके यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच शालन अंकुश जरे,आप्पासाहेब जरे, ग्रामविकास अधिकारी ढेपे, तलाठी गौतम ससाणे,तलाठी राजकुमार आचार्य आदी उपस्थित होते.
सरपंच जरे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब डोके,भागवत डोके,गोकुळ पाचबैल, अमोल पवळ,सुनीता अनिल डोके, सविता बाबासाहेब आढाव,लक्ष्मीबाई माणिक जरे,लताबाई रामदास धोत्रे यांनी उपसरपंचपदी स्वाती डोके निवड केली. यावेळी आप्पासाहेब जरे, डाॅ. सुभाष जरे, गहिनीनाथ पाचबैल, संतोष डोके, धनंजय डोके, डाॅ.आप्पा डोके, कांतीलाल जरे, परसराम डोंगरे, सोमनाथ जरे, सुहास पवार, अशोक गोरे, दत्तात्रय जरे, मनोहर डोके, गणेश डोके आदी उपस्थित होते.
===Photopath===
300321\45191403img-20210330-wa0311_14.jpg