स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षपदी गजानन जगताप, तर कार्यवाहपदी विवेक पालवणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:02+5:302021-03-24T04:31:02+5:30
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलाच्या नवीन कार्यकारिणीच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. अध्यक्षपदी गजानन ...

स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षपदी गजानन जगताप, तर कार्यवाहपदी विवेक पालवणकर
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलाच्या नवीन कार्यकारिणीच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. अध्यक्षपदी गजानन जगताप, कार्यवाह डॉ. विवेक पालवणकर, सदस्य म्हणून डॉ. सुरेखा देशमुख, रवींद्र देशमुख, सतीश कुलकर्णी, प्रदीप देशमुख, अनिल राजेंद्र, जयश्री नेलवाडकर, डॉ. सुनील तिडके, डॉ. सीमा जोशी, प्रमोद कुलकर्णी, शिवाजीराव फड, डॉ. संजय शिरोडकर, प्रदीप देशमुख, प्रदीप जोशी, प्रा. चंद्रकांत मुळे यांची निवड करण्यात आली.
अर्थ समितीवर आनंद बार्शीकर आणि ॲड. सुहास सुलाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. सुभाष जोशी, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलूरकर, कार्यवाह नितीन शेटे यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, पर्यवेक्षक नंदकिशोर झरीकर, अधीक्षक डॉ. प्रशांत तालखेडकर, डॉ. देवीदास नागरगोजे, डॉ.राजेश भुसारी यांची उपस्थिती होती.
===Photopath===
230321\23bed_7_23032021_14.jpg
===Caption===
बीड येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वा.सावरकर शैक्षणिक संकुलाच्या नवीन कार्यकारणीच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.