तीन दिवसांपासून विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:38+5:302021-02-25T04:41:38+5:30
धारूर : तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या काळविटाला वाचविण्यात शेतकरी आणि वनविभागाला यश आले. तालुक्यातील आसोला येथे जामदेव तांड्याकडे ...

तीन दिवसांपासून विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवदान
धारूर : तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या काळविटाला वाचविण्यात शेतकरी आणि वनविभागाला यश आले. तालुक्यातील आसोला येथे जामदेव तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रामभाऊ जाधव यांच्या शेतातील विहिरीत तीन दिवसांपूर्वी काळवीट पडले होते. याला काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला मात्र त्यांना यश आले नाही. तिन दिवस त्याला अन्न पुरवठा केला. तसेच वनविभागास ही माहिती कळविली. वनविभागाने बुधवारी सकाळी शेतकऱ्यांच्या मदतीने या काळविटात बाहेर काढून यांला वाचवण्यात यश आले. काळविटाला काही जखमा झाल्याने त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या काळवीटाचे प्राण वाचवण्यात यश आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश चोले यांनी वनविभागाशी संपर्क केल्यानंतर बुधवारी सकाळी तात्काळ धारूर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. ग्रामस्थ रामभाऊ जाधव, सुभाष अंकुशे, विकास चोले, डॉ. गणेश चोले आदी शेतकरी ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी काळविटाला विहिरीबाहेर काढल्याने काळविटाचे प्रार वाचले. असोला परीसरात वर्षातील ही दुसरी घटना आहे.
===Photopath===
240221\img_20210224_102227_14.jpg