शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेचा पोलिस कोठडीतच अन्नत्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:00 IST

घर जाळणाऱ्यांसह ॲट्रॉसिटीतील आरोपींना अटक करण्याची मागणी

बीड : अर्धनग्न करून मारहाण करण्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला कुख्यात गुंड सतीश ऊर्फ खोक्या भोसले याने शिरूरच्या पोलिस निरीक्षकांना सोमवारी अर्ज केला. यात त्याने आपले घर जाळणाऱ्यांसह ॲट्रॉसिटी व पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. खोक्या हा २० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

खोक्याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केली तसेच शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला केला. गांजाही जवळ बाळगला. अनेक प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस घरात ठेवले. या सर्व प्रकरणात खोक्याविरोधात चकलांबा आणि शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खोक्या हा सहा दिवस फरार होता. बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली होती. त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ती संपण्याआधीच खोक्याने सोमवारी शिरूर पोलिसांकडे अर्ज करून न्याय देण्याची मागणी करत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

सुरेश धसांकडून पाठराखणभाजपचे आ. सुरेश धस यांनी खोक्या हा आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली होती. वनविभागाने आपल्या जागेत अतिक्रमण केल्याने त्याचे घर पाडले. त्यानंतर भाजपचे आ. सुरेश धस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच याबाबत घाई केल्याचेही त्यांनी म्हटले. तर ढाकणे कुटुंबाचीही आ. धस यांनी भेट घेतली. खोक्यासारख्या कुख्यात गुंडाची आ. धस पाठराखण का करत आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. या आगोदर ओबीसीचे नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनीही खोक्या हा हरणाचे मांस आ. धस यांना पुरवत असल्याचा आरोप केला होता.

घर जाळणाऱ्यांची दिली नावेराधाबाई भाऊसाहेब भोसले यांनीही पोलिसांना अर्ज केला आहे. यात त्यांनी घर जाळणाऱ्यांची नावे दिली आहेत. त्यांना आरोपी करावे, अशी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी तक्रार देताना आपण जखमी होते. त्यामुळे नावे आठवली नाहीत, असे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या