शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:46 IST

Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे.

BJP Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांनी पवनचक्की खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधात सुरू केलेली मोहीम आणखी व्यापक करणार असल्याची माहिती आहे. "वाल्मीक कराडची मांजरसुंभा परिसरात २०-२५ एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर ही जमीन आहे. कराडच्या सर्व संपत्तीबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचं काम सुरू असून ही कागदपत्रे मी ईडीकडे देणार आहे," असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे.

वाल्मीक कराडवर आरोप करताना सुरेश धस म्हणाले की, "कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावावर मांजरसुंभा इथं २०-२५ एकर जमीन घेतली. या जमिनीतील खड्डे बुजवण्यासाठी रसाळ नावाच्या व्यक्तीच्या जमिनीतून त्याच्या मर्जीविरोधात मुरुम नेण्यात आला. कराडची अशी अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. त्याची कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे. ईडीकडून याआधीच नोटीस आली असून मी पुन्हा तक्रार करणार आहे," असं आमदार धस यांनी सांगितलं आहे.

"आरोपींना विदर्भातील तुरुंगात टाका"

खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने आपल्याला लातूर जिल्ह्यातील तुरुंगात हलवावं, असा अर्ज पोलीस प्रशासनाकडे केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर आरोपींना मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगात न नेता विदर्भातील तुरुंगामध्ये न्यावं, अशी मागणी धस यांनी केली आहे. "हे आरोपी त्यांना लातूरच्या तुरुंगात नेण्याची मागणी का करत आहेत, याची माझ्याकडे माहिती आहे. पण जेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा मी सांगेन. पण या आरोपींना लातूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगही नको, त्यांना विदर्भात ठेवा. कारण तिकडच्या तुरुंगाचे अधिकारी बदलत असतात," असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुरेश धस यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, अशी मागणी आमदार धस यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडSuresh Dhasसुरेश धसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडBeed policeबीड पोलीस