धारूर : बंगळुरू- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात आसोला येथील युवक चालक आबासाहेब बाबासाहेब चोले हा मयत झाल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले होते.त्यात लहान मुलांचा सांभाळ आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. धारूर पंचायत समितीचे सभापती हनुमंत नागरगोजे यांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला अधार देण्याच्या उद्देशाने आर्थिक मदत जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. तर चोले यांच्या तीन मुलांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी राष्ट्रवादी ओबीसी अघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे यांनी घेतली. ईश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या मुलांचे शिक्षण हाेणार आहे.
आसोला येथील तरुण आबासाहेब चोले हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणूण काम करत होता. ६ मार्च रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे कुटुंब शेतात कुडाच्या घरात राहत आहे. आबासाहेब चोले याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला मदतीची गरज होती. ही बाब ओळखून सभापती हनुमंत नागरगोजे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. दहा दिवसांत समाजातील दानशूर मंडळींकडून १ लाख ५७ हजार रुपयांचा निधी संकलित केला. यातील काही मदत नगदी स्वरूपात देऊन इतर रक्कम मुदत ठेवीच्या रूपाने देण्याची व्यवस्था केली. या कुटुंबाला शासन योजनेतून घरकुल लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इतर कुठल्या शासकीय योजनाचा लाभ या कुटुंबास देऊन अधार देता येईल का, याचा प्रयत्न केला जात आहे. संकटकाळी या कुुटुंबाला मोठा अधार देण्याचे काम सामाजिक भावनेतून झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
===Photopath===
170321\img_20210317_111159_14.jpg
===Caption===
अपघातात मयत झालेल्या आसोला येथील चालक आबासाहेब चाले याच्या कुटुंबाला समाजातून १ लाख ५७ हजाराचा निधी संकलित करून आधार देण्यात आला. तसेच प्रा. ईश्वर मुंडे यांनी चाेले यांच्या तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.