शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक नवनीत काँवत यांचे बीड पोलिस दलात मोठे बदल, ठाण मांडलेले कर्मचारी बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:29 IST

मुख्यालय, शाखेत ठाण मांडलेले कर्मचारी बाहेर काढले; पाेलिस ठाण्यांत वाढले मनुष्यबळ

बीड : पोलिस दलातील जवळपास ३० ते ४० टक्के कर्मचारी हे आतापर्यंत राजकीय वशिला अथवा लक्ष्मीदर्शन करून विशेष शाखा किंवा मुख्यालयात थांबत होते. अनेकांनी तर नोकरीला लागल्यापासून पोलिस ठाण्यात कामच केले नव्हते. अशा सर्वांचा शोध घेऊन त्यांना आता पोलिस ठाण्यात पाठविले आहे. त्यामुळे ठाण्यातील मनुष्यबळही वाढले आहे. आता सामान्यांना विश्वास वाटेल, असे काम करा, अशा सूचना पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठाणेदारांना दिल्या.

जिल्ह्यात जिल्हा पोलिस दलात जवळपास २३०० कर्मचारी आहेत. यातील केवळ १ हजारच कर्मचारी हे पोलिस ठाण्यात काम करत होते. इतर कर्मचारी हे विशेष शाखा, साइड ब्रँच, पोलिस मुख्यालय अथवा इतर शाखेत कार्यरत हाेते. परंतु, यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बदलीचे काही निकष लावल्याने अनेकांची तारांबळ झाली. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना आता पाेलिस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन काम करून घ्या, त्यांना काम शिकवा, अशा सुचनाही काँवत यांनी दिल्या आहेत.

२९ ठाण्यांत केवळ १ हजार कर्मचारीआतापर्यंत २३०० पैकी केवळ १ हजार कर्मचारी हे पोलिस ठाण्यात काम करत असे. कमी मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण यायचा. त्यामुळे ते संताप व्यक्त करायचे. १३०० कर्मचारी हे आतापर्यंत बाजूलाच होते. त्यांना गुन्ह्याचा तपास कसा करतात, दोषारोपपत्र कसे बनवतात, हेच माहिती नाही. पण, आता या सर्वांना काम करावे लागणार आहे. अशा लपून बसलेल्यांना पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली आहे.

दोन ठाण्यांची अडचणबीड शहर आणि परळीतील संभाजीनगर पोलिस ठाण्यात अगाेदरच्यापेक्षा कमी मनुष्यबळ दिसत आहे. परंतु, तेदेखील वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र लोक दिले जाणार आहेत. १० जूनपर्यंत यावर निर्णय होणार आहे.

कामात गती येईलकाही कर्मचारी हे विशेष शाखा किंवा इतर ठिकाणी कार्यरत होते. परंतु, मी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बदल्या केल्या. शिवाय पोलिस ठाण्यातही मनुष्यबळ वाढवून दिले. त्यामुळे कामात गती येईल. जे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार.-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

कशी आहे मनुष्यबळाची आकडेवारीपोलिस ठाणे - अगाेदर - आताबीड शहर - ५०- ४२बीड ग्रामीण - ४४ - ४७पेठबीड - ४६ - ४६शिवाजीनगर ६२ - ६८पिंपळनेर - ३१ - ३३गेवराई - ६२ - ७२तलवाडा - २८ - ३४चकलांबा - ३२ - ३७आष्टी - ४८ - ६८पाटोदा - ३९ - ५३अंभोरा - ३७ - ४०अंमळनेर - २८ - २९शिरूकासार - ३७ - ३८अंबाजोगाई शहर - ६० - ६७अंबाजोगाई ग्रामीण - ४६ - ४३परळी शहर - ४० - ४०संभाजीनगर - ४३ - ३८परळी ग्रामीण - ३१ - ४२बर्दापूर - ३२ - ३८केज - ४९ - ६३धारूर - ३६ - ४१युसूफवडगाव - २८ - ३२नेकनूर - ३८ - ४३माजलगाव शहर - ४० - ६४माजलगाव ग्रामीण - ४० - ५१सिरसाळा - ३२ - ३७वडवणी - ३२ - ४९दिंद्रूड - २८ - ३३

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस