प्रेमविवाह केल्याच्या रागातून माजी सभापतींकडून सुनेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:57+5:302021-08-24T04:37:57+5:30

बीड : मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सुनेला मारहाण करत तिच्या जीपची तोडफोड केल्याच्या आरोपावरून येथील कृषी उत्पन्न ...

Sunela beaten up by former speakers out of anger over love marriage | प्रेमविवाह केल्याच्या रागातून माजी सभापतींकडून सुनेला मारहाण

प्रेमविवाह केल्याच्या रागातून माजी सभापतींकडून सुनेला मारहाण

बीड : मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सुनेला मारहाण करत तिच्या जीपची तोडफोड केल्याच्या आरोपावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर आंधळे यांच्यासह पाचजणांवर गुन्हा नोंद झाला. २१ ऑगस्ट रोजी येथे वडवणी येथे घटना घडली. निकिता शिवाजी आंधळे (वय २१, रा. साठे चौक, वडवणी, हमु. बोडखा ता. धारुर) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांनी वडवणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी दिनकर आंधळे यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, सासरकडील लोकांना तो मान्य नव्हता. त्यामुळे त्या मागील काही दिवसांपासून माहेरी राहत होत्या. २१ ऑगस्ट रोजी त्या सासरी वडवणी येथे जीपमधून गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माझा नवरा कुठे आहे, अशी विचारणा केली असता, सासरे दिनकर आंधळे, दीर अमोल आंधळे, पोपट जाधवर, मेघराज मुंडे व सोफियान शेख यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. जीपचीही तोडफोड केल्याचे निकिता यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून पाचजणांवर गुन्हा नोंद झाला.

कौटुंबिक वाद थेट ठाण्यात

दरम्यान, सासरे दिनकर आंधळे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून, दीर अमोल आंधळे हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. वडवणीतील राजकीय वर्तुळातील बडे प्रस्थ समजल्या जाणाऱ्या आंधळे कुटुंबातील वाद थेट ठाण्यात पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे.

--------

Web Title: Sunela beaten up by former speakers out of anger over love marriage