‘सूर्यनमस्कार, योग्य आहारातून शारीरिक व मानसिक विकास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:23+5:302021-06-23T04:22:23+5:30

श्री खोलेश्वर संकुल, योग समन्वय समिती पूर्व बीड व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात ...

‘Sun salutation, physical and mental development through proper diet’ | ‘सूर्यनमस्कार, योग्य आहारातून शारीरिक व मानसिक विकास’

‘सूर्यनमस्कार, योग्य आहारातून शारीरिक व मानसिक विकास’

श्री खोलेश्वर संकुल, योग समन्वय समिती पूर्व बीड व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात योग सप्ताहात आयोजित दुसऱ्या सत्रात ते बोलत होते.

नगरसेवक तथा खोलेश्वर प्राथमिक विद्यालय समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे यांनी योग व आहार या विषयाची मांडणी करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी नियमित नियमांचे पालन करावे म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या नियमांचे पालन करावे. नियम म्हणजे तप, नियमित अभ्यास, स्वाध्याय, मन व शरीर शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे. ध्यान व धारणा हे त्याचे मार्ग आहेत. शारीरिक बल व मानसिक बल वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार व विविध योगासने करावीत, तसेच आहारात कडधान्य, फळे व पालेभाज्या नियमित घ्याव्यात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते. याप्रसंगी विविध योगासने कशी करावीत, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन योगगुरू वामनराव ईटकूरकर यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक निवृत्ती दराडे व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक, विद्यार्थी व पालक ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित होते.

Web Title: ‘Sun salutation, physical and mental development through proper diet’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.