साकुड येथे विवाहितेची नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 19:41 IST2018-06-28T19:41:05+5:302018-06-28T19:41:43+5:30
साकुड येथील मुलतान तांड्यावरील बुशराबी इब्राहीम पठाण (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

साकुड येथे विवाहितेची नैराश्यातून आत्महत्या
अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील साकुड येथील मुलतान तांड्यावरील बुशराबी इब्राहीम पठाण (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
बुशराबी पठाण यांचे पती भंगार मालाचे व्यावसायिक आहेत. दोन वर्षापूर्वीच या दांपत्याचा विवाह झाला होता. मात्र, मागील काही काळापासून बुशराबी यांना नैराश्याने ग्रासले होते. यापूर्वीही त्यांनी एकदा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास बुशराबी यांनी राहत्या घरी पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहित मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.