अंबाजोगाईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:44 PM2019-07-02T15:44:36+5:302019-07-02T15:46:22+5:30

अभियांत्रिकीच्या परीक्षेत नापास झाल्याने होता व्यथित

suicide of engineering student in Ambajogai | अंबाजोगाईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या

अंबाजोगाईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या

Next

अंबाजोगाई (बीड ) : अभियांत्रिकीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. 
 
गणेश तुकाराम कराड (वय २४, रा. वांगदरी, ता. परळी) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे सर्व कुटुंबीय अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गणेश सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला. ही बाब गणेशच्या मनाला लागल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. सोमवारी दुपारी ३ ते ६ वाजताच्या दरम्यान त्याचे आई-वडील गावाकडे शेतात गेले होते. यावेळी घरात कोणीच नसताना गणेशने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी त्याचे आई-वडील गाव्कडून परतल्यानंतर ही घटना उघड झाली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ. कुलकर्णी करत आहेत. उमद्या मनाच्या गणेशच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: suicide of engineering student in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.