साळेगावात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:21 IST2020-02-27T23:20:26+5:302020-02-27T23:21:23+5:30
केज तालुक्यातील साळेगाव येथे एका चाळीस वर्षीय इसमाने घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली.

साळेगावात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
केज : केज तालुक्यातील साळेगाव येथे एका चाळीस वर्षीय इसमाने घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली.
संतोष दिगंबर पोपळघट (वय ४० वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. संतोष हे गावातच वेल्ंिडगचे काम करतात. त्यांनी गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात स्कार्फच्या सहाय्याने आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
मयताचे चुलत भाऊ दिनकर दत्तू पोपळघट यांच्या खबरी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार जाधव हे करीत आहेत.