आवरगावच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:13+5:302020-12-29T04:32:13+5:30

धारूर : आसरडोह येथे रविवारी एका सुशिक्षित बेरोजगार तरूणाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आवरगाव येथील सुशिक्षित बेरोजगार जय प्रदीप ...

Suicide of an educated unemployed youth of Awargaon | आवरगावच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाची आत्महत्या

आवरगावच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाची आत्महत्या

धारूर : आसरडोह येथे रविवारी एका सुशिक्षित बेरोजगार तरूणाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आवरगाव येथील सुशिक्षित बेरोजगार जय प्रदीप जगताप (वय २५) याने धारूर शहरातील आडस रस्त्यावरील दुकानात सोमवारी सकाळी आत्महत्या केली. धारूर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबाजोगाई रोडवर त्याचे इलेक्ट्रॉनिक व मोटाररिवायंडिंगचे दुकान होते. सोमवारी पहाटेच्या वेळी व्यायामासाठी बोलावण्यास गेलेल्या मित्राला जयचा काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्याने शटरमधून आत डोकावून पहिले तर आत जयने आत्महत्या केलेले चित्र दिसून आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जयच्या पश्चात वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. जयवर सोमवारी सकाळी आवरगाव येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. धारूर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए. एस. आय. गोविंद बास्टे हे करत आहेत.

Web Title: Suicide of an educated unemployed youth of Awargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.