विकलेल्या जमिनीचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:39+5:302021-03-22T04:30:39+5:30
बीड : जमीन विक्री केल्यानंतर त्याचे पैसे न दिल्याने आर्थिक विवंचनेतून एकाने आत्महत्या केली होती. ही घटना १७ मार्च ...

विकलेल्या जमिनीचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या
बीड : जमीन विक्री केल्यानंतर त्याचे पैसे न दिल्याने आर्थिक विवंचनेतून एकाने आत्महत्या केली होती. ही घटना १७ मार्च रोजी केज तालुक्यातील दहीफळ येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश विठ्ठल तांदळे (वय ३५, रा. अंबिलवडगाव ता.जि. बीड) यांनी १६ मार्च रोजी त्यांची सासरवाडी असलेल्या केज तालुक्यातील दहीफळ शिवारातील एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची पत्नी राणी गणेश तांदळे यांच्या फिर्यादीवरून आत्महत्या केल्याप्रकरणी राकेश वामन जाधवर (रा. सिंधू हाउसिंग सोसायटी, आळंदी रोड, येरवडा, पुणे) याच्यावर नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार गणेश यांनी राकेश जाधवर याला जमीन विक्री केली होती. मात्र, त्याचे पैसे देण्यास राकेश याने नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून गणेश तांदळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि सिद्धे हे करत आहेत.