कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:06+5:302021-07-07T04:41:06+5:30

पाटोदा : नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी पुण्याहून वडवणीकडे निघालेल्या ऊसतोड कामगाराच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात हात-पाय तुटून ...

Sugarcane worker killed in car crash | कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराचा मृत्यू

कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराचा मृत्यू

पाटोदा : नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी पुण्याहून वडवणीकडे निघालेल्या ऊसतोड कामगाराच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात हात-पाय तुटून त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाटोदा तालुक्यातील थेरला गावाजवळ झाला.

संतोष भानुदास राठोड (वय ३५, रा. जोडआंबा तांडा, ता. वडवणी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी संतोष कुटुंबासह पुणे जिल्ह्यात राहुपिंपळगाव (ता. दौंड) येथे उसाच्या गुऱ्हाळावर ऊस तोडणीसाठी गेला होता. नातेवाईकाच्या मुलीचे लग्न असल्याने रविवारी संतोष एकटाच दुचाकीवरून (एमएच-२१, ए.झेड.-१२६५) वडवणीकडे निघाला होता. सायंकाळी ७ च्या सुमारास तो पाटोदा तालुक्यातील थेरला गावाच्या शिवारात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच-११, एके-२०३०) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने गाडी जागेवर सोडून पळ काढला. पाटोदा पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत संतोष राठोड याच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Sugarcane worker killed in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.