शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Walmik Karad : अचानक वाल्मीक कराडची प्रकृती खालावली; ईसीजी काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:47 IST

Walmik Karad : वाल्मीक कराड याची अचानक प्रकृती खालावली आहे, रुग्णालयात तपासणी दरम्यान त्याचा ईसीजी काढला आहे.

Walmik Karad ( Marathi News ) : वाल्मीक कराड याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, वाल्मीक कराड याचा ताबा एसआयटी घेणार आहे. दरम्यान, वाल्मीक कराड याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कराड याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ईसीजी काढण्यात आला आहे. कराड याची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. 

वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकीय चाचणीवेळी त्याचा ईसीजी काढण्यात आला. सध्या अजूनही मेडिकल चेकअप सुरू आहे, प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. 

Walmik Karad : वाल्मीक कराडला मकोका, सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'कायद्या पुढे कोणीही मोठं नाही..."

न्यायालयीन कोठडीत रवानगी

पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकील आणि वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज कोर्टाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे समजते. तसा अर्जही पोलिसांनी केजच्या वरिष्ठ कोर्टाकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर एसआयटीकडून पुन्हा कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.

आठ आरोपींना मकोका

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आऱोपींवर मकोका कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी कराड याला या गुन्ह्यात घेण्यात आले नव्हतं. त्यानंतर दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाल्मीक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर मकोका कायद्यासह हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून कराडवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिस