किल्ल्याच्या बुरूजावरील झाडे काढण्यात दुर्गप्रेमींना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:01+5:302021-02-05T08:24:01+5:30
धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्यातील पुरातन भिंतींवर उगवलेल्या झाडांमुळे या भिंतीना धोक निर्माण होत असल्याने ती मुळासह काढून ...

किल्ल्याच्या बुरूजावरील झाडे काढण्यात दुर्गप्रेमींना यश
धारूर
: येथील ऐतिहासिक किल्ल्यातील पुरातन भिंतींवर उगवलेल्या झाडांमुळे या भिंतीना धोक निर्माण होत असल्याने ती मुळासह काढून परिसर स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. किल्ल्याच्या बुरूजावरील झाडे काढण्यात दुर्गप्रेमींना यश आले आहे.
शहरातील दुर्गप्रेमी व कायाकल्प फाऊंडेशन यांच्या वतीने ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यातील तटबंदी व बुरुजावरील मोठ्या प्रमाणात पिंपळ, लिंब व इतर झाडे काढण्याची मोहीम सातत्याने दर रविवारी दोन तास श्रमदानाच्या माध्यमातून सुरू आहे. ही झाडे वाढल्याने तटबंदी व बुरुज ढासळत आहेत. तटबंदी व बुरुज या ऐतिहासिक वास्तू पुढील पिढीला पाहता यावी, यासाठी संवर्धनाचे कार्य दुर्गप्रेमींनी हाती घेतले आहे. कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे हे प्लंबिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याने त्यांच्याकडे सर्व साहित्य उपलब्ध आहे. या साहित्याचा आधार घेत ते मोठ्या धैर्याने ऐतिहासिक तटबंदी व बुरुजावरील झाडे काढत आहेत. या अभियानात सय्यद शाकेर, ग्रामपंचायत सदस्य कैलास बोरगावकर, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सचिव विश्वानंद तोष्णिवाल, अलंकार कामाजी, ज्ञानेश्वर शिंदे व जलदूत विजय शिनगारे यांनी सहभाग घेतला.