दुचाकीवर स्टंटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:22+5:302021-07-14T04:38:22+5:30

बाजोगाई : शहरात काही दिवसांपासून युवक रात्रीच्यावेळी दुचाकीवर ट्रिपलसीट बसून विविध प्रकारची स्टंटबाजी करत आहेत. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना याचा त्रास ...

Stunting on a bike | दुचाकीवर स्टंटबाजी

दुचाकीवर स्टंटबाजी

बाजोगाई : शहरात काही दिवसांपासून युवक रात्रीच्यावेळी दुचाकीवर ट्रिपलसीट बसून विविध प्रकारची स्टंटबाजी करत आहेत. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. यावर नियंत्रणाची मागणी होत आहे.

कठडे तुटले

बीड : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोराफाटादरम्यान रस्त्याच्या वळणावर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. कठडे दुरुस्तीची मागणी होत आहे.

शाळेत स्वच्छतेची मागणी

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे शाळेच्या आवारात स्वच्छता केलेली नाही. तरी शाळा परिसर स्वच्छ करण्याची मागणी पालकांतून होत आहे.

पाण्याची नासाडी

बीड : शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणी टंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

Web Title: Stunting on a bike