शब्दरचना, देहबोलीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST2021-07-13T04:08:01+5:302021-07-13T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : एक प्रभावी वक्ता अथवा संवादकर्ता बनण्यापूर्वी एक उत्कृष्ट श्रोता बनणे आवश्यक असते. त्याचा फायदा ...

शब्दरचना, देहबोलीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे - A
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : एक प्रभावी वक्ता अथवा संवादकर्ता बनण्यापूर्वी एक उत्कृष्ट श्रोता बनणे आवश्यक असते. त्याचा फायदा प्रभावी कौशल्य विकसित करण्यासाठी होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी शब्दरचना, देहबोलीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संजय मगर यांनी व्यक्त केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल आयोजित मासिक संवाद कार्यक्रम शनिवारी ऑनलाइन पार पडला. प्रभावी संवाद कौशल्य या विषयावर संजय मगर बोलत होते. प्रभावी संवाद कसा साधायचा. प्रभावी संवादाचे फायदे, संवाद साधत असताना देहबोलीचा पडणारा सकारात्मक प्रभाव व मानसिकता यासंदर्भात मगर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य डॉ. विजयकुमार सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक पिंपळे, कार्यालय अधीक्षक गवंडी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. हनुमंत हेळंबे यांनी सूत्रसंचालन केले.