गहू काढणीसाठी विद्यार्थी शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:38+5:302021-03-05T04:33:38+5:30
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात सध्या गहू काढणीला वेग आला असून ऊस तोडणीमुळे गहू काढणीला मजूरच मिळत नाहीत. मजुरी दर ...

गहू काढणीसाठी विद्यार्थी शेतात
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात सध्या गहू काढणीला वेग आला असून ऊस तोडणीमुळे गहू काढणीला मजूरच मिळत नाहीत. मजुरी दर महिला २०० रु. रोज तर पुरुष ३०० रुपये रोज देऊनही कामाला येत नाहीत. सध्या शाळा, कॉलेज कोरोनामुळे बंद आहेत. ग्रामीण भागात लाईट व रेंज समस्या असल्याने शिक्षणाचेही तीन तेरा वाजलेले दिसून येत आहेत. म्हणून आई-वडिलाना मुले आता चांगली मदत करू लागली आहेत. मजुरीसह खताचेही दर वाढले आहेत. ५० किलोची खताची गोणी दीड हजारांपर्यंत गेली आहे. बैल जोडी १ लाखापर्यंत गेली. डिझेल ९० रुपये लीटर झाले. पेरणी ते काढणीपर्यंत खर्च काढला तर शेतकऱ्यांना हाती काहीच राहत नाही.