वडवणीतील २३ शाळांमधील विद्यार्थी होणार संगणक साक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:54+5:302021-06-23T04:22:54+5:30
बीड : जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील २३ उच्च प्राथमिक शाळांना मानव विकास योजनेतून मंजूर संगणक लॅबसाठी आवश्यक संगणक संच व ...

वडवणीतील २३ शाळांमधील विद्यार्थी होणार संगणक साक्षर
बीड : जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील २३ उच्च प्राथमिक शाळांना मानव विकास योजनेतून मंजूर संगणक लॅबसाठी आवश्यक संगणक संच व ग्रंथालयाचे साहित्य मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारुक यांनी दिली.
तंत्रज्ञानात रोज नवनवीन बदल होत असताना संगणकाचे ज्ञान आवश्यक बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीही संगणक साक्षर व्हावेत, यासाठी मानव विकास योजनेतून वडवणी तालुक्यातील २३ उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणक लॅबसाठी आवश्यक साहित्य नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्व शाळांमध्ये लवकरच या लॅब कार्यान्वित होतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. तसेच ग्रंथालयामुळे अवांतर वाचनाची आवडही निर्माण होईल, असे डॉ. विक्रम सारुक यांनी सांगितले.
------
संगणकपूरक साहित्यासह पुस्तके
मानव विकास योजनेतून मंजूर लॅबसाठी संगणक, एलसीडी प्रोजेक्टर, मल्टी फंक्शनरी मशीन टॅबलेट, ऑनलाईन युपीएस आदी साहित्याचे वितरण करण्यात आले, तर ग्रंथालय उपक्रमांतर्गत विविध वाचनीय पुस्तकांचा समावेश आहे. या साहित्यामुळे वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.
-----------