शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वर्चस्वासाठी बहीण-भावातच संघर्ष; विधानसभेची तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:17 IST

या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

ठळक मुद्देविधानसभा मतदारसंघ परळी : झालेली विकास कामे भाजपा उमेदवारासाठी जमेची बाजू

संजय खाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून मताधिक्य मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाचा बालेकिल्ला या लोकसभा निवडणुकीतही अभेद्य राहण्यासाठी भाजपाने व्यूहरचना आखली आहे तर परळी विधानसभा मतदार संघात आपले वर्चस्व राहण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेधनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत व पोटनिवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात भाजपाला मताधिक्य प्राप्त झालेले आहे. गेल्या पोटनिवडणुकीत डॉ.प्रीतम मुंडे यांनाही मताधिक्य मिळाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनाही भरघोस मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे विरूध्द धनंजय मुंडे अशी बहीण-भावात लढत झाली होती.या लढतीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात भाजपाचा हा बालेकिल्ला पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत ढासळू दिला नाही. मात्र त्यानंतर झालेल्या नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीत मात्र धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे