अट्टल घरफोड्या परळी शहरात जेरबंद

By Admin | Updated: January 1, 2015 00:26 IST2015-01-01T00:06:07+5:302015-01-01T00:26:59+5:30

परळी : गेल्या १५ दिवसात तीन दुकाने फोडून लाखोंचा ऐवज चोरणाऱ्या घरफोड्याला परळीत बुधवारी ताब्यात घेण्यात आले. उन्मेश मुंजाभाऊ फड (रा. मरळवाडी, ता. परळी) असे त्या पकडण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे

Strong burglar pierced in Parli city | अट्टल घरफोड्या परळी शहरात जेरबंद

अट्टल घरफोड्या परळी शहरात जेरबंद


परळी : गेल्या १५ दिवसात तीन दुकाने फोडून लाखोंचा ऐवज चोरणाऱ्या घरफोड्याला परळीत बुधवारी ताब्यात घेण्यात आले.
उन्मेश मुंजाभाऊ फड (रा. मरळवाडी, ता. परळी) असे त्या पकडण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजी चौकाजवळील पंकज चैनसुख जाजू यांच्या मोटारसायकल विक्रीच्या दुकानातून नगदी रोख रक्कम व नोटा मोजण्याची मशीन दुकान फोडून पळवून नेण्यात आली. तसेच गेल्या आइवड्यात गुंडाळे यांची कपड्याची दुकान फोडून लाखो रूपये किंमतीचे कपडे चोरून नेले होते. तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर भागात १५ दिवसापूर्वी तोतला यांचे मोबाईल शॉपीचे दुकान फोडून ६६ हजार रूपयांचा ऐवज पळवून नेला होता. घरफोड्या करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्याचे आव्हान परळी पोलिसांसमोर होते. निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजित विस्पुते, फौजदार सुरेश डांगे, चंद्रकांत घोळवे, रमेश जाधवर, जमादार राहुल डोळस, पो. ना. सखाराम पवार, अमोल येळे, सचिन सानप, इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने बुधवारी दुपारी उन्मेशच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी सुरू आहे. इतर दोघे फरार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Strong burglar pierced in Parli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.