राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST2020-12-27T04:25:01+5:302020-12-27T04:25:01+5:30
थंडी वाढल्याने नागरिकांना त्रास धारूर : गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून, वातावरणात दिवसभर गारवा ...

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेला हरताळ
थंडी वाढल्याने नागरिकांना त्रास
धारूर : गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून, वातावरणात दिवसभर गारवा असतो, तर सकाळी व सायंकाळी थंडीने कुडकुडत बसण्याची वेळ येते. यासाठी परिसरातील नागरिक उबदार कपड्यांसह शेकोटीचाही आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करणाऱ्या साहित्याची मागणी आहे.
धारूर डोंगरपट्ट्यात पक्षी-प्राणी वाढले
धारूर : तालुक्यात डोंगराळ भागात पाणी साठे व तलावाची संख्या वाढल्याने पक्षी-प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दाणापाणी मुबलक उपलब्ध होत असून पाणी साठ्याच्या बाजूला त्यांची रेलचेल वाढली असून, दुर्मिळ असणारे काही प्राणी, पक्षी या भागात दिसून येत आहेत. त्यांच्या रक्षणासाठी वन विभागाने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : शहरात चहाच्या टपऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. टपरी चालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देणे अपेक्षित आहे, असे असतानाही अनेक टपरी चालक ग्राहकांना काचेच्या ग्लासात, तसेच कप-बशीत चहा देऊ लागले आहेत. यामुळे संसर्ग होऊ शकतो, यासाठी कागदी ग्लासच्या वापराची मागणी होत आहे.
घाटातील कठड्याची उंची वाढवा
धारूर : धारूर घाटात राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी झाली. रस्ता चकाचक झाला, मात्र घाटाच्या कडेला असणाऱ्या तटबंदीची दुरुस्ती न केल्याने वाहनधारकांना धोका निर्माण होत असून अपघात होत आहेत.