पाटोद्यात कडकडीत लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:18+5:302021-03-27T04:35:18+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश काढलेले आहेत. मात्र या लॉकडाऊनच्या विरोधात जिल्हाभरातील ...

Strict lockdown in Patodya | पाटोद्यात कडकडीत लॉकडाऊन

पाटोद्यात कडकडीत लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश काढलेले आहेत. मात्र या लॉकडाऊनच्या विरोधात जिल्हाभरातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शुक्रवारी औषधी दुकाने, दवाखाने, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, व्यापारपेठ बंद होत्या. या लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत किराणा , भाजीपाला , दूध आदी दुकाने उघडी ठेऊन हे सामान घरपोच करण्यास परवानगी होती. मात्र पाटोदा येथील व्यापाऱ्यांनी या लॉकडाऊनला विरोध म्हणून सकाळपासूनच दुकाने कडकडीत बंद ठेऊन प्रशासनाच्या निर्णयास विरोध दर्शविला. दरम्यान तहसीलदार रमेश मुंडलोड व पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी पाटोदा शहरातील मुख्य रस्त्यावर पथसंचलन केले.

===Photopath===

260321\popat raut_img-20210326-wa0089_14.jpg

Web Title: Strict lockdown in Patodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.