लाॕकडाऊनच्या निषेधार्थ धारूरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:51+5:302021-03-27T04:34:51+5:30
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या नावाखाली हा लॉकडाऊन लादल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी २६ मार्च ...

लाॕकडाऊनच्या निषेधार्थ धारूरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या नावाखाली हा लॉकडाऊन लादल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लाॕॅकडाऊन लागू केला आहे. यामुळे व्यापारी व सर्वसामान्य तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन न करता निर्बंध कडक करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने ही बाब विचारात न घेता लॉकडाऊन लावल्याने व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. लाॕॅकडाऊन काळात सकाळी सात ते नऊ होलसेल , किरकोळ किराणा वितरक, भाजीपाला विक्रेत्यांना शिथिलता असताना या काळात व्यवहार कडकडीत बंद ठेवत शासनाच्या धोरणाला विरोध दर्शविण्यात आला. हा बंद बेमुदत पाळण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी सांगितले.
===Photopath===
260321\img_20210326_090125_14.jpg