माजलगावप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:46+5:302021-07-22T04:21:46+5:30

केज : माजलगाव तालुक्यात एका २८ वर्षीय नराधमाने ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय घृणास्पद व ...

Strict action should be taken against the culprits in Majalgaon case | माजलगावप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी

माजलगावप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी

Next

केज : माजलगाव तालुक्यात एका २८ वर्षीय नराधमाने ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय घृणास्पद व लाजिरवाणी असून, यातील दोषींना तत्काळ शिक्षा व्हावी, तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी आपण स्वतः राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना करणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांनी सांगितले.

माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काँग्रेसच्या नेत्या व जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांनी या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणे करून पुन्हा असे प्रकार करण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

210721\img-20210516-wa0027.jpg

माजी खा.रजनीताई पाटील.

Web Title: Strict action should be taken against the culprits in Majalgaon case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app