अद्यापही पथदिवे बंद अवस्थेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST2021-03-22T04:29:56+5:302021-03-22T04:29:56+5:30

बीड : शहरातील अंबिका चौक, पिंपरगव्हाण मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड बनले ...

The streetlights are still off | अद्यापही पथदिवे बंद अवस्थेतच

अद्यापही पथदिवे बंद अवस्थेतच

बीड : शहरातील अंबिका चौक, पिंपरगव्हाण मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड बनले आहे. बीड नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

अडीच हजार किराणा कीटचे वाटप

बीड : जिल्ह्यातील अंमळनेर, सौताडा, शिरूर, साकतफाटा, गहिनीनाथ गडाखालील वस्तीवर पालावर राहणाऱ्या भटक्या आदिवासी लोकांना किराणा मालाच्या अडीच हजार कीट वाटप केल्या. यामध्ये साखर, डाळ, तांदूळ, गहू, तेल, शेंगदाणे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी प्रदीप जाधव, नागरगोजे, गित्ते आदी उपस्थित होते.

वीज तोडणी थांबविण्याची मागणी

बीड : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले तर महाविकास आघाडीच्या सरकारने उरलासुरला पार जीवच काढायचे ठरविले आहे असा सूर जनतेतून निघत आहे. वीज खंडित करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवून होणारे नुकसान थांबवावे अन्यथा शेतकरी महिलांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असे समाजसेविका सुरेखा जाधव यांनी कळविले आहे.

Web Title: The streetlights are still off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.