राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:42+5:302021-02-05T08:21:42+5:30
खामगाव- पंढरपूर राज्य रस्त्यावर धारुर -तेलगाव दरम्यान आरणवाडी साठवण तलावाजवळ रस्ता उंचीचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते. परंतु ...

राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम बंद करा
खामगाव- पंढरपूर राज्य रस्त्यावर धारुर -तेलगाव दरम्यान आरणवाडी साठवण तलावाजवळ रस्ता उंचीचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते. परंतु त्या एजन्सीने दुसऱ्या सब एजन्सीला काम दिले. मात्र या कामाकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचा एकही अधिकारी फिरकत नाही. सदरील एजन्सी मनमानी करून थातूरमातूर पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करुन शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे. अशा एजन्सीवर कारवाई करुन हे काम तत्काळ थांबवावे नसता शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार धारुर यांना देण्यात आला.
सदरील निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद यांना देण्यात आल्या आहेत. तालुका प्रमुख नारायण कुरुंद, विनायक ढगे, शहर प्रमुख बंडु शिनगारे, तालुका संघटक राजकुमार शेटे, तालुका सचिव बाबा सराफ, तालुका समन्वयक चंद्रसेन तिडके,उपशहर प्रमुख नितीन सद्दिवाल, सुनील भांबरे, राज तिडकेसह शिवसैनिकांनी हा इशारा दिला आहे.