शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थांबता थांबेना! मराठा आरक्षणासाठी 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 22:24 IST

मराठा आरक्षण मिळत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथे रविवारी सायं. 6 वाजता उघडकीस आली. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

बीड : मराठा आरक्षण मिळत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथे रविवारी सायं. 6 वाजता उघडकीस आली. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मच्छिंद्र हा शनिवारी परळीतील मराठा मोर्चात सहभागी झाला होता. रविवारी घरी आल्यानंतर तो चिंताग्रस्त होता. घरातील सदस्य बाहेर जाताच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठा आरक्षणावरुन राज्यात सुरू असलेले आत्महत्येचा सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे या 23 वर्षीय तरुणानेही आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. राहत्या घरीच गळफास घेऊन मच्छिंद्रने आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच, पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले आहे, असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी ठिय्या मांडला. आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उप विभागीय अधिकारी विकास माने, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उशिरापर्यंत नातेवाईकांसोबत चर्चा सुरू होती.

जिल्ह्यात चौथी आत्महत्याआतापर्यंत जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी चौघांनी जीवन संपविले आहे. यामध्ये अभिजित देशमुख (विडा, ता. केज), शिवाजी तुकाराम काटे (रा. पिंपळनेर, ता. बीड), कानिफ दत्ता येवले (डोंगरकिन्ही, ता. पाटोदा) यांनी यापूर्वीच आत्महत्या केली आहे. रविवारी मच्छिंद्रने गळफास घेऊन जीवन संपविले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSuicideआत्महत्या