लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऊसतोड व वाहतूक कामगार मुकादम यांना ऊसतोडणी दर वाढीसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. या मागणीला पाठिंबा देत बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.३ आॅक्टोबरला ऊसतोड कामगारांची परिषद होणार असल्याचे सांगून कामगारांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा यावेळी ऊसतोड कामगार संघर्ष समितीने दिला. ऊसतोड कामगारांना दरवाढ देणारा नविन करार करावा, ऊसतोडणी चा दर ४०० रुपये करा, ऊस वाहतूकीच्या दरात ५० टक्के वाढ करा, मुकादमांचे कमीशन दर २० टक्के करा, राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगार, मुकादम यांची माथाडी बोर्डात तात्काळ नोंदणी सुरु करुन त्यांना ओळखपत्र द्या, अपघात विमा लागू करा, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना कायमस्वरूपी वसतीगृह उभारावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा ऊसतोड कामगार संघर्ष समितीचे पांडुरंग आंधळे, मोहन जाधव, नागेश मीठे पाटील, अशोक येडे, भाई दत्ता प्रभाळे, डॉ.संजय तांदळे, ज्ञानोबा तांदळे, बाळासाहेब तांदळे, पांडुरंग तांदळे, मोहन नागरगोजे, रवी राठोड अनंत तांदळे, विलास तांदळे, लहू तांदळे, शहादेव तांदळे आदींसह शेकडो ऊसतोड कामगार उपस्थित होते.
उसतोड कामगारांचा बीड तालुक्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:32 IST